मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचा विमा कवच तात्काळ द्या

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघ चिमुर यांची भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचेकडे मागणी
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमूर— कोरोणा महामारीमुळे संपुर्ण जग होरपळून निघाले.भारताला सुद्धा त्याची झळ मोठ्या प्रमाणात बसली .कोरोणाच्या दोन्ही लाटामूळे जनता होरपळून निघाली.लाखो लोक कोरोणामुळे मरण पावले.कोरोणा महामारित कोरोणा सर्वेक्षण , गृहविलगिकरण अशा प्रकारची धोक्याची कामे राज्यसरकारी कर्मचारी यांनी केली.ही कामे करित असतांनाच कोरोणाची लागण होऊन अनेक कर्मचारी मरण पावली त्यामुळे त्यांचे कुटुंब, मुलं-बाळ रस्त्यावर आलीत.कोरोणा योद्धांची कूटूंबिय उद्ध्वस्त झालीत.
२८एप्रिल २०२० चा शासण निर्णय निर्गमित करण्यात आला.यात ५०लाखाचा विमा कवच देण्यात आला पण दोन वर्षांचा कालावधी लोटुनही शासनाने कोरोणा योद्धा कूटूंबियांना विमा कवच दिला नाही व सर्व सामान्य व्यक्ती कोरोणा मुळे मरण पावल्यास ५० हजारांची मदत जाहीर केली ती सूद्धा मिळाली नाही. राज्य सरकारी कर्मचा-यांना ५० लाखांचा विमा व जनतेला ५०हजाराचा मदत तात्काळ देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघ चिमुर कडून भारताचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघ चंद्रपूर जिल्हा सहसचीव रामदास कामडी , राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधीकारी महासंघ चिमुर चे अध्यक्ष राजेंद्र शेंडे , कवडू लोहकरे,अमीत लवणकर, अक्षय लांजेवार, विनायक हजारे,पटवारी कोहपरे ,राजु बन्सोड ,अशोक विभुते,दिलीप उरकुडे आदी सदस्य उपस्थित होत.