ताज्या घडामोडी

सर्वधर्म समभाव ठेवून सर्व धर्माचा आदर करावा – नामदार विजय वडेट्टीवार

चिमुर तालुक्यातील नेरी येथील सत्कार समारंभ संपन्न

नामदार विजय वडडेटीवार यांचे ग्रा प ,कांग्रेस कमिटी व गुरुदेव ग्रामीण पतसंस्था नेरी च्या वतीने भव्य स्वागत व सत्कार समारंभ

तालुका प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

सध्या संपुर्ण राज्यात धर्मा धर्माच्या नावाने अराजकता माजली असून धर्माच्या नावाने राजकारण करून आपली पोळी शेकली जाईल असे राजकारण सुरू आहे भोंग्या व हनुमान चालीसावरून राज्यात वादळ सुरू आहे परंतु धर्माचे नाव पुढे करून राजकारण करू नये सर्वधर्म समभाव ठेवून सर्व धर्माचा आदर करावा सामाजिक तेढ निर्माण करु नये समाजात शांतता ठेवावी असे प्रतिपादन नामदार विजय वडे्टीवार पालकमंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री यांनी नेरी येथील भव्यदिव्य सत्कार व स्वागत समारंभ कार्यक्रमात केले.
चिमुर तालुक्यातील नेरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात दि 25 ला नामदार विजय वडेट्ठीवार पालकमंत्री यांच्या प्रथम आगमना प्रित्यर्थ भव्य दिव्य स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन नेरी शहर कांग्रेस कमिटी महिला कांग्रेस कमिटी युवक कांग्रेस कमिटी आणि गुरुदेव पतसंस्था व नेरी ग्रा.पं च्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजयभाऊ डोंगरेमाजी अध्यक्ष चंजीमस बँक हे होते प्रमुख अतिथी म्हणून धनराज मुंगले,सौ.ममता डुकरे,घनश्याम डुकरे,सरपंच रेखा पिसे,सौ.शोभाताई पिसे,सौ.लताताई पिसे माजी सभापती, प्रशांत पिसे,अरुण पिसे,मनोहर पिसे,गुलाबराव पिसे,किशोर शिंगरे,विलास डांगे,ओम खैरे, श्रीनिवास शेरकी ,निखिल पिसे,चंद्रभान कामडी उपसरपंच,प्रफुल्ल खापर्डे,कमलाकर बोरकर, गजानन बुटके,श्रीनिवास शेरकी हे उपस्थित होते
यावेळी नामदार विजय वडेटीवार यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात आले यात मुस्लिम समाज आणि सर्व कांग्रेस कमिटी व मान्यवरांच्या हस्ते जोरदार स्वागत करण्यात आले तसेच कराटे प्लेअर मध्ये आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते सुशांत इंदोरकर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी पुढे बोलताना नामदार वड्डेटीवार म्हणाले की नेरी येथील कार्यकर्त्यांच्या प्रेमानी मला नेरीला ओढत आणले तेव्हा येथील विकास साधण्यासाठी दोन पादणं रस्त्यासाठी ६० लाख व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांची निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली तसा ठराव द्यावा घरकुल व जबराणजोत धारकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल त्यांना येत्या एक महिन्यात सर्व अधिकारी वर्गाला बोलावून समस्या निकाली काडून पट्टे देण्यात येईल घरकुलाचा प्रश्न सुटेल,घोडाझरी धरणाचे पाणी नेरी पाणीपुरवठा योजनेला देण्यात येईल असे सांगितले तसेच नेरी येथील पिण्याचे पाण्याची समस्या सोडविण्याचे आस्वासन दिले याप्रसंगी अध्यक्षस्थानी म्हणून संजय डोंगरे यांनी आपल्या मार्गदर्शनात नेरी गावाच्या समस्या बदल पालकमंत्री याना अवगत केले तसेच रुस्तमखा पठाण यांनी मुस्लिम समाजा च्या समस्या पालकमंत्र्याना सांगितल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर वासेकर यांनी केले तर संचालन रवींद्र पंधरे आभार संगीता कामडी ग्रा प सदस्य यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेरी कांग्रेस कमेटी व ग्रामपंचायत संपूर्ण सदस्य गण यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close