विदर्भस्तरीय नाभिक समाज मेळावा संपन्न
प्रतिनिधी : गणेश पगाडे
महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा आयोजित उपवर वधू परिचय सोहळा व विदर्भ स्तरीय समाज मेळावा – २०२२ नागपुरातील सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. आमदार मोहन मते, आमदार कृष्णाजी खोपडे प्रमुख अतिथी तर महारष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेशाध्यक्ष मा. श्री दत्ताजी अनारसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रदेश कार्याध्यक्ष श्री बंडूभाऊ राऊत, उपाध्यक्ष श्री श्यामजी आस्करकर, विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष यावेळी मंचावर उपस्थित होते.
समाज भूषण – सौ हीराताई बोरकर, समाज गौरव – प्रा. डॉ निवृत्ती पिस्तुलकर (नाभिक विषयावर संशोधन, यवतमाळ) समाज गौरव- श्रीमती वनिता घुमे (सदस्य महिला आयोग, चंद्रपूर), समाज गौरव – श्री अतुल मानेकर (सामाजिक क्षेत्र) तथा श्री गुणवंतराव लक्षणे, नागपूर ग्रा. (राजकीय क्षेत्र) श्री संदीप शिंदे, (सामाजिक सेवा, यवतमाळ) चिंतामण लक्षणे (संघटन व समाज सेवा) यांना समाज गौरव सन्मानाने गौरविण्यात आले. माजी राज्य कार्याध्यक्ष श्री अंबादास पाटील तथा पहिले नागपूर जिल्हाध्यक्ष श्री वसंतराव चिंचाळकर यांना प्रदीर्घ काळ समाज सेवा केल्याबद्दल “जीवन गौरव” पुरस्काराणे सन्मानित करण्यात येऊन त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व अनेक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच म.ना.म. नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा ला प्रशस्तीपत्र ( युवा सृजनशील कार्य 2014-19) देऊन गौरविण्यात आले.
कू. कनक मिराशी हिने गणेश वंदना सादर करून व मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक सरचिटणीस राजेंद्र इंगळे यांनी केलेत. स्पर्धा परीक्षेत प्राविण्य प्राप्त यांचा गुणगौरव करण्यात आला व विद्यार्थ्यांना त्यांचे द्वारे मार्गदर्शन देण्यात आले. महामंडळाच्या भंडारा(श्री जगदीशजी सुर्यवंशी), गोंदिया (श्री बेनिरामजी फुलबांधे), गडचिरोली (श्री तुषारजी चोपकर), चंद्रपूर (श्री रमेशजी हनुमंते) आदी जिल्हाध्यक्ष यांचा तथा श्री प्रवीणजी सावरकर (प्रदेश उपाध्यक्ष), श्री रामकृष्ण शिरुळकर, श्री राजीव बाभुळकर (प्रदेश सदस्य) वरूड,अमरावती
श्री मधुकरराव क्षीरसागर (विदर्भ उपाध्यक्ष) चंद्रपूर, श्री शरद उरकूडे (विदर्भ पूर्व युवा अध्यक्ष ), श्री संजय चन्ने (विदर्भ पूर्व प्रसिद्धी प्रमुख) आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या वेबसाईट ( www.nabhikmahamandal.com ) वर Business Portal चे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले.
आदरणीय श्री दत्ताजी अनारसे यांनी अध्यक्षीय भाषणात समाज संघटन बाबतीत मौलिक सूचना, विदर्भ व नागपुरातील संघटन कार्याचा गौरव करून सद्य परिस्थितीतील समाज व्यवस्थेवर भाष्य करून, उपस्थित समाज समुदायाला संबोधित केलेत.
प्रदेशाध्यक्ष आ. श्री दत्ताजी अनारसे व सौ अनारसे (माई) यांचा नागपूर शाखेच्या वतीने सपत्नीक सन्मान करण्यात आला.
मराठवाडा विदर्भ, मध्य प्रदेश व राज्यातील अनेक भागातून आलेल्या उपवर – वधू यांनी वधुवर परिचय सोहळ्यात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.ना.म. नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेंद्र फुलबांधे, सचिव श्री विनेश कावळे, श्री योगेश नागपूरकर, कार्यालयीन सचिव श्री विजय वलुकार, श्री विनोद जमदाडे, श्री अक्षय जांभुळकर, म.ना.म. एकता मंच चे श्री वैभव तुरक, श्री सतीश सुरशे नागपूर, म.ना.म.कौशल्य विकास चे प्रशिक्षक श्री धरम अतकरे सर, महिला आघाडी च्या सौ. भावना कडू, सौ. वनिता जाधव, सौ. मंजुषा पाणबुडे यांनी प्रयास केले. आभार प्रदर्शन नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष श्री राजेंद्रजी चिंचाळकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.