हिवरा येथील शेतकऱ्यांची २४ हेक्टर शेतजमीन होणार पुनर्जीवित

कृषी विभाग पाणलोट अंतर्गत पुनर्जीवन कामाचे भूमिपूजन व कामाची सुरुवात…..
जिल्हा प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दिनांक २१/०३/२०२२ रोज सोमवारला कृषी विभाग पाणलोट अंतर्गत शेत जमीन पुनर्जीवन कामाचे भूमिपूजन करून हिवरा येथील गौरव चहारे यांचे शेतापासून पुनर्जीवन कामाची सुरुवात करण्यात आली.
कृषी विभागाच्या पाणलोट अंतर्गत पुनर्जीवन या कामात हिवरा येथील शेतकऱ्यांचे जवळपास २४ हेक्टर शेतजमीनीचे क्षेत्र पुनर्जीवित होणार आहे. या पुनर्जीवन झालेल्या कामानंतर शेतीला नवसंजीवनी निर्माण होऊन शेतीची सुपीकता, पाणी सांठवण्याची क्षमता वाढते व याचा लाभ गावातील चोवीस हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी ग्रा.प. सरपंच निलेश पूलगमकर, ग्रा.प. सदस्य जितेंद्र गोहणे, माजी उपसरपंच प्रकाश हिवरकर, पाणलोट समिती अध्यक्ष जगदीश पुलगमकर, पाणलोट सचिव मंगेश कुत्तरमारे, कृषी सहाय्यक रवींद्र चेन्दे, माजी ग्रा.प. सदस्य चांगदेव पा. चहारे, दिलीप पुलगमकर, मंगेश पुडके, गौरव चहारे उपस्थित होते.