ताज्या घडामोडी

महासमृद्धी महिला सक्षमीकरण व जागतिक महिला दिन साजरा

शहर प्रतिनिधी : अमर रंगारी मुल

8 मार्च 2021 ला ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मूल अंतर्गत यशस्वी प्रभागसंघ चिचाला – केळझर द्वारे जागतिक महिला दिन कोरोना अटी व नियमांचे पालन करून चिचाला येथे साजरा करण्यात आला.
ग्रामीण विकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवग महिलांना समृद्ध, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे.
महिलांच्या सर्वांगिन विकासासाठी व जागतिक महिला दिनानिमित्त अभियानामार्फत स्वयंसहायता समूहाच्या चळवळीची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम घडवून जागतिक महिला दिनानिमित्त अभियानामार्फत समुदाय संस्था ची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी जागतिक महिला दिन 8 मार्च 2021 ते जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2021 या दरम्यान कालबद्ध पद्धतीने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा. श्री चंदू भाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. वर्षाताई लोनबले पंचायत समिती सदस्य मुल, प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुक्तेश्वर सोयाम उपसरपंच चिरोली व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. भावना कुमरे यांनी केले प्रस्ताविक माया सुमटकर तर उपस्थितांचे आभार मयूर गड्डमवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमर रंगारी प्रभाग समन्वयक व प्रभागातिल ICRP यांनी सहकार्य केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close