गुरुजीं चा स्नेह मिलन सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ,बाबुपेठ चंद्रपूर येथे सन १९९८-२००० या शैक्षणिक सत्रात डि.एड शिक्षण घेतलेल्या सर्वांनी तब्बल २१ वर्षानंतर एकत्र येऊन कुटूंबासमावेत स्नेह मिलन साेहळा दिनांक ५ डिसेंबर २०२१ राेज रवीवार ला राघमवार साहेब यांच्या समाधान फार्म हाऊस ,बाेर्डा तह- जिल्हा -चंद्रपूर येथे आनंदी वातावरणात ,माेठ्या उत्साहात साजरा केला .
डि.एड पास हाेऊन २१ वर्ष पुर्ण झाली.स्नेह मिलन साेहळ्यात दिर्घ वर्षानंतर सर्वच डि.एड मित्र एकत्र आले.खुप गप्पा,गमतीजमती,झाल्या.सर्वांनी आपापली काैटुंबिक व सामाजीक भुमिका मांडली.या स्नेहमिलनास नांदेडहून काही मित्र आलीत.ज्यांनी डि.एड चंद्रपूरला पुर्ण केलेले हाेते.
ब-याच वर्षानंतर एकत्र भेटल्यामुळे सर्वांनी आपापल्या वतीने सखाेल परीचय दिला.आनंदी अविस्मरणीय क्षण सर्वांनी अनुभविले. डि.एड मध्ये शिकविणा-या सर्व प्राध्यापक वृंदांना नमन करण्यात आले. जुन्या आठवणीला उजाळा दिला.बाबुपेठ येथिल हाेस्टलच्या गमतीजमती झाल्या.ब-याच जणांना आपण एकत्र येऊन पुन्हा डि.एड वर्गात अभ्यास वर्गासाठी बसलेले आहाेत ,असा जणू भास झाला. स्नेहमिलन साेहळा उत्कृष्ठ पार पडावा,यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे नियाेजन नितीन रामभाऊ खाडीलकर,अजय अशाेक भगत, कु.ज्याेती कल्लुरवार यांनी केले.
सदर स्नेहमिलनाचे सुत्रसंचालन अजय भगत ,वराेरा यांनी केले तर खेळीमेळीच्या वातावरणात आभार वामन चाैधरी,मुल यांनी व्यक्त केले.
आठवणीतील ताे क्षण ..सर्वाना सुखद अनुभूती देऊन गेला.