पोलीस मिञ परिवार समन्वय समितीने “प्रजासत्ताक दिन”गरिब निराधार मुला-मुलिंना बिस्किट,कपडे व जेवण देऊन केला साजरा!!!
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.२६/१/२०२२ :पोलीस मिञ परिवार समन्वय समिती संपुर्ण महाराष्ट्र भर पोलीस विभागतील कर्मचाऱ्यांनसाठी,व महाराष्ट्रातील संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना होत असलेल्या समस्या साठी महाराष्ट्र सर्व पदधिकारी व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र काम करित आहे.”प्रजासत्ताक दिनाचे” औचित्य साधुन निराधार फासेपारधी विकास संस्था वडाळी येथे फासेपारधी समाजातील भिक मागणाऱ्या मुले-मुलिंना शौक्षणिक प्रवाहात आणण्याचे व या मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तिपासून दुर ठेवण्याचे काम संस्थेच्या संचालिका निकिता पवार यांनी स्थापना केलेले “गुरुकुल प्रकल्प आपली राहुटी” गेल्या ६ वर्षा पासुन येथे शिक्षण घेत असलेल्या फासेपारधी समाजातील शालेय विद्यार्थांना कपडे,बिस्किट,व ईतर साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष व समिती संस्थापक अध्यक्ष-मा.डॉ.संघपाल उमरे,कार्यक्रमाचे उदघटक-मा.सुभाषजी सोंळके,अमरावती विभागिय प्रमुख-मा.मनिष गुडधे,अमरावती जिल्हा अध्यक्ष-मा.कैलाशजी विंचुरकर,अमरावती जिल्हा महासचिव-मा.राजेंन्द्रजी तांबेकर,अमरावती महिला प्रमुख-मा.सुमनताई काळबेडे,स्मिताताई ईटणारे,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष मा.गजाननजी ईटणारे,अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख-मा.ओंकार येंगल,भातकुली तालुका अध्यक्ष-मा.धनराज खर्चान,भातकुली तालुका उपाध्यक्ष मा.कुंदन गजभिये,धामणगाव रेल्वे कोषाध्यक्ष मा.अतुल पुनवटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.सर्व प्रथम सर्व पाहुण्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणुन भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रजोलन करुन हार अर्पण करण्यात आला.व सोबतच फासेपारधी संस्थेच्या संचलिका यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती सतत कुठे ना कुठे पोलीस विभागासाठी तर कुठे सर्व सामान्य नागरिकांन साठी गरज असेल तेथे गंभीर दखल घेऊन काम करते समितीने जे काही आज दिल पुढेही याही पेक्षा जास्त मदत करेल या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघटक मा.सुभाषजी सोंळके यांनी व्यक्त केले.निराधार फासेपारधी विकास संस्था संचालिका निकाता पवार यांनी फासेपारधी समाजातील अगदी लहान-सहान मुले भिक मागणे,चोरी करणे ईतर कारणासाठी अगोदरच खुप बदनाम आहे त्यात त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी समाजव्यस्थे कडून खुप ञास होत आहे.असे संवेदनशील मनोगत या प्रसंगी व्यक्त केले.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती असे संवेदनशील कार्यासाठी सदैव मदत करते या साठी सर्वांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.संघपाल उमरे यांनी केले व समितीच्या कार्याविषयी व पुढे या निराधार फासेपारधी विकास संस्थेस प्रशासकीय स्तरावर काय व कशी मदत करता येईल या साठी मी स्व:ता या कडे जातिने लक्ष देईल असेही मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजेंन्द्रजी तांबेकर अमरावती जिल्हा महासचिव यांनी तर आभार निराधार फासेपारधी विकास संस्था संचालीका निकिता पवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शोभाताई सोंळके,मिनाताई गुडधे,सिमाताई उमरे,सरफराज खान,शिलांनद झामरे,स्वपनाताई पुनवटकर,या सर्व पोलीस मिञ परिवार समिती पदधिकाऱ्यांनी सहकार्य व मदत केली.समितीने राबवलेल्या या उपक्रमाचे समाजातील कडुन व नागरिकांन कडुन कौतुक केले जात आहे.