ताज्या घडामोडी

निराधार आजीबाई ला ‘नाते आपुलकी’ चे मदतीचा हात

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा येथील रस्त्यावरील खरडे व प्लास्टिक गोळा करून स्वतःची व मुलाचे पोट भरण्यासाठी धडपड करणाऱ्या वृद्ध महिलेला नाते आपुलकीचे संस्थेने दिला मदतीचा हात.
वरोरा येथील रत्नमाला चौक परिसरात खरडे व प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी चालणारी आजीबाईची धडपड नाते आपुलकीचे संस्थेचे सदस्य किसन नागरकर यांनी पाहली.आजीबाईची विचारपूस केल्यानंतर मुलाच्या उपचारासाठी व जगण्यासाठीची रोजची हीच धडपड असल्याचे सांगितले.संस्थेच्या सदस्यांनी गरज ओळखून मिनाक्षीताई दरेकर व वृषालीताई जोरोंडे,रजनी ताई ढुमनें यांनी व संस्थेच्या सदस्यांनी मदत देण्याचा निर्णय घेतला .डोमाबाई गणपत जीलटे रा.नवीन वस्ती ,वरोरा यांचा 35 वर्षीय मुलगा मागील 6 ते 8 महिन्यापासून खाटेवरच असल्याने त्याच्या उपचारासाठी व 6 महिने पुरेल इतके धान्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले .त्यांची गरज ओळखून त्यांना तेलाचा पिपा ,तांदूळ ,गहू कट्टा,छत्री व उपचारासाठी मदत केली.मदत करतेवेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष भाऊ ताजने ,उपाध्यक्ष किसन नागरकर व वरोरा येथील सदस्य प्रशांत बदकी, धनराज आसुटकर ,आरती ताई रोडे व धीरज लाकडे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close