परभणी येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती ची भव्य मिरवणूक

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खानापूर फाटा ते छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भव्य शोभायात्रा व मिरवणूक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती च्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मिरवणूक व भव्य शोभायात्रा वसमत रोड मार्गे काढण्यात येणार आहे.
वसमत रोड येथील खानापूर फाटा या ठिकाणाहून या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत.
त्यामध्ये छ्त्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, पारंपारिक पालखी सोहळा, पारंपरिक वाद्य, झांजपथक, वारकरी पथक, लेझीम पथक, लाठीकाठी, तलवारबाजी, हलगी पथक, बँड पथक, ढोल-ताशा, घोडे, मावळे, सजीव देखावा हे या शोभायात्रेचे आकर्षण राहील
वसमत रोड येथुन सायंकाळी 4 वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.
खानापूर फाटा, काळीकमान, शिवशक्ती बिल्डिंग मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे नितीन देशमुख ,बालाजी मोहिते,गजानन जोगदंड यांनी केले आहे.