नेरी येथे संविधान सभागृहाची निर्मिती करावी – कृती समितीची मागणी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत नेरी येथे संविधान सभागृहाची निर्मिती करावी अशी मागणी आज दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी संविधान भवन निर्मिती कृती समिती नेरीने केलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत गावातील सर्व वस्त्यांमधील मूलभूत सुविधांची कामे झाल्यानंतर समाज मंदिराचे बांधकाम जातीय ऐक्याच्या दृष्टीने संपूर्ण गावासाठी एकच समाज मंदिर असावे या योजनेअंतर्गत संविधान सभागृहाचे बांधकाम करणे तसेच त्यामध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक समाज घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचविणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माहिती ग्रामीण भागापर्यंत पोचविण्यासाठी तसेच नेरीत ग्रंथालय व अभ्यासिका यासारख्या अद्यावत सुविधांसह संविधान सभागृह सुरू करावे अशी मागणी सविधान सभागृह निर्मिती कृती समितीने केली यावेळी ज्ञानेश्वर नागदवते, स्नेहदीप खोब्रागडे, माणिक नगराळे, डॉक्टर रमेश राऊत, संजय नागदेवते (पत्रकार), जयदेव डांगे, अमोल पोपटे, रवीना राऊत (माजी ग्रामपंचायत सदस्य), व इतर मान्यवर उपस्थित होते.