बाजार समीतीचे कामकाज हे शेतकरी व व्यापारी यांचे हिताचे असेल

पाथरी कृषी बाजार समीतीच्या वतीने आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा केला भव्य सत्कार.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तरुणांना संधी देण्याचे संकेत.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सहकारी संस्था , ग्रामपंचायत ,व्यापारी व हमाल मापारी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालक मंडळ बहुमताने निवडणूक देत बाजार समीतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम ठेवली. बाजार समितीचे कामकाज हे शेतकरी व व्यापारी यांच्या हिताचेच असेल असा विश्वास आमदार बाबाजानी दुराने यांनी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेतकऱ्याला उत्तर देताना व्यक्त केला.याशिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समीतीसाठी तरूणांना संधी देण्याचे संकेत यावेळी दिले.
आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे पाथरी तालुक्यातील विकासामध्ये मोलाचा सहभाग आहे.याचाच एक भाग म्हणून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत या बाजार समीतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहीले आहे.या यशाबद्दल पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या वतीने आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा सभागृहात शुक्रवारी २ जुन रोजी भव्य सत्कार केला.याप्रसंगी अँड.मुंजाजी भाले पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्तराव मायंदळे,रा.काँ तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे,बाजार समीती सभापती अनिलराव नखाते, उपसभापती शाम धर्मे,संचालक विजयकुमार सिताफळे, अशोक आरबाड,विष्णु काळे,रामप्रसाद कोल्हे,संजिव सत्वधर,गणेश दुगाणे,आनंद धनले,सय्यद गालेब,आमोल बागंड,शेख दस्तगीर,याशिवाय सुभाषराव कोल्हे,नारायणराव आढाव,विक्रम गायकवाड,नितीन शिंदे,सिद्धेश्वर शिंदे,भागवत घुंबरे,विठ्ठल घांडगे,मारोती गिराम,वैजनाथ महिपाल,पप्पु गलबे,दत्ता वराडे,भागवत टाकळकर, नवनाथ वाघ,साहेबराव बिटे ,डिगांबर लिपने,अशरफ खान,गुलाबराव पवार,मंचक ढगे,बिभीषण नखाते,बाबासाहेब नखाते,देविदास मोहीते,पांडुरंग भांडवलकर,शेख ईमरोज,अलिम भाई,रतन मोगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी सत्कार उत्तर देतांना आ.बाबाजाणी दुर्राणी म्हणाले की,शेतीमालाला चांगला भाव मिळवून शेतकरी आर्थिक सक्षम कसा होईल अशा पध्दतीने बाजार समीतीने कामकाज करावे.विरोधीपक्ष हा अल्पदिवसाचा आहे त्याला भविष्य नाही अशाप्रकारे चौफेर फटेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समीती ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. या निवडणुकीत तरूणांना संधी दिली जाईल असे संकेत आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी यावेळी बोलतांना दिले.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतांना आ.बाबाजाणी दुर्राणी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक मंडळ उत्तमरीत्या काम करून शेतकरी व व्यापारी यांच्या विकासासाठी कटीबद्ध राहील असे सभापती अनिवलराव नखाते यांनी व्यक्त केले.याप्रसंगी अँड.मुंजाजी भाले पाटील, दत्तराव मायंदळे,एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.