ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिमुरची रेतीघाट सुरू करण्याची मागणी

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चिमूर तालुक्यात मागील अनेक दिवसापासून रेतीघाट बंद असल्यामुळे अनेक बांधकाम रेती अभावी अडचणीत सापडलेले आहे. तसेच रेती घाट बंद असल्यामुळे रेती तस्करांचे दिवसेंदिवस फावत चाललेले आहेत. अनेक घरकुल लाभार्थी व इतर बांधकाम करणाऱ्या जनतेला महाग दरात रेती घ्यावी लागत आहे. रेतीची असणारी जनतेची अडचण लक्षात घेता रेती घाटाचा लिलाव करून घाट सुरू करावे जेणेकरून घरकुल लाभार्थ्यांना व इतर बांधकाम धारकांना होणारी रेतीचे अडचण दूर होईल यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चिमूर यांनी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मनिषा वजरे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), दीपक दुधे(तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), मेहबूब शेख (तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस), स्वरूप तळवेकर , संजय घरत, गौतम रामटेके यांनी मागणी केलेली आहे. रेतीची अडचण संपूर्ण चिमूर तालुक्यातील बांधकाम धारकाची असून ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याची मागणी सुद्धा जनतेने केलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close