सिकलसेल आजाराच्या यशस्वी प्रतिबंधासाठी विवाह पूर्व मार्गदर्शन/ समुपदेशन शिबीर संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
सर्वोदय युवा विकास संस्था चिमूर तथा प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी यांच्या वतीने सिकलसेल सप्ताह दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 मध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. स्तनदा माता ,गरोदर माता, किशोरवयीन मुले- मुली, विवाहयोग्य मुले- मुली,तसेच वाहक व पीडित यांना सिकलसेल आजारावर समुपदेशन करण्यात आले. सिकलसेल अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे निदान रक्ताची तपासणी करून करता येते. गरोदर वाहक आणि पीडित मातेने विशेष काळजी घ्यावी तसेच गर्भजल चिकित्सा करून घ्यावी, पाणी भरपूर प्यावे, हिरवा भाजीपाला जास्त प्रमाणात खायला हवा. सिकलसेल ग्रस्त रुग्णांना प्रथिनांची व समतोल आहाराची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. वाहक व्यक्ती पूर्णपणे निरोगी असतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे दिसून येत नाही परंतु प्रत्येक वाहक हा तर त्याने दुसऱ्या वाहकासी अथवा पीडीतासी लग्न केले तर पुढच्या पिढीला या आजाराचा प्रसार करू शकतो. त्यामुळे वाहकाने वाहकाची किंवा पीडित व्यक्तीशी शक्यतो लग्न करू नये असे लग्न टाळावे असे प्रतिपादन डॉक्टर सतीश वाघे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना केले या दरम्यान 94 सिकलसेल तपासणी करण्यात आली तसेच वाहक व पीडित यांना आरोग्यविषयक आहार विषयक औषध उपचार यांच्यावर सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. सिकलसेल सप्ताह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल डांगरे तसेच सर्वोदय संस्थेचे पर्यवेक्षक तथा स्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. सप्ताह यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सतीश वाघे (CH O), टी.बी .भोयर(आरोग्य सहाय्यक), नसरीन बानो (LHV), प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवक आरोग्य सेविका व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.