ताज्या घडामोडी

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणूक दरम्यान दिलेला वचन पूर्ती करताना

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

राज्याचे नगर विकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते स्थानिक कामगारांना नियुक्ती पत्र वितरण.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे उभारण्यात आलेल्या लोहखनिज प्रकल्पात काम करणाऱ्या १७८१ स्थानिक कामगारांना आज नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे त्रिवेणी कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लोहखनिज प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना रोजगाराची नवी संधी मिळाली आहे. याशिवाय कंपनीच्या माध्यमातून ऑक्सिजनप्लांट कार्यान्वित करणे, स्थानिक नागरिकांना कौशल्यविकास प्रशिक्षण देणे, पुरुषांना सुरक्षा कर्मचाऱ्यांचे तर महिलांना गाडी, ट्रक, क्रेन, जेसीबी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय याठिकाणी अधिक गुंतवणूक आणून याठिकाणी स्वतंत्र पोलाद निर्मिती उद्योग सुरू करण्याचा कंपनीचा मानस असून त्यासाठी देखील शासन सकारात्मक आहे. गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणून या जिल्ह्याला औद्योगिक महत्त्व प्राप्त व्हावे या दिशेने टाकलेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.
यासोबतच ब्लॉकचेन पद्धतीने जातप्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमाला देखील आजपासून सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत ६५ हजार जात प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. एकात्मिकआदिवासी_विकास प्रकल्प भामरागड यांच्या मार्फत तयार करण्यात आलेल्या कसनसूर, हालेवारा, तोडसा, जंबिया येथे उभारण्यात आलेल्या ६८४ विद्यार्थी क्षमतेच्या ४ वसतीगृहांचा लोकार्पण सोहळा देखील आज संपन्न झाला.
याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, आमदार धर्मराव बाबा आत्राम, सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता, त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे संचालक बी.प्रभाकरन आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close