ताज्या घडामोडी

संविधान साक्षरता हाच संविधान संरक्षणाचा मूलमंत्र

प्रतिनिधीःराहुल गहुकर

चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहारात 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे विचारमंचावर मान्यवर बोलत होते.
आजचे आपले सन्मानाचे, न्यायाचे जीवन ही संविधानाची देण असून पशुतुल्य जगण्यातून माणसाला माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार संविधानाने बहाल केला. आपल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. (कलम 14 ते 18 – समानतेचा हक्क, कलम 19 ते 22 – स्वातंत्र्याचा हक्क, कलम 23, 24 – शोषणााविरुध्द हक्क, कलम 25 ते 28 – धर्मस्वातंत्र्याचा हक्क, कलम 29 ते 31 – सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 32 ते 34 – सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क.) मूलभूत अधिकार काय असतात? व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे आणि जीविताचे रक्षण करणारी ही संरक्षक भिंत असते.संविधान दिनी आपण कमीत कमी संविधानाचे आरक्षण, हक्क अधिकार याविषयी प्रबोधन केले तरी भारतीय समाज संविधान साक्षर होण्यास सुरवात होईल. अश्या शब्दात मार्गदर्शन करतांना मा. वैभव गजभिये, श्रीकांत शेंडे, अशीत बांबोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संविधान आणि सद्याची परिस्थिती यावर कार्यक्रमांचे अध्यक्ष मा. जगदीश रामटेके यांनी प्रकाश टाकला.
संविधान सन्मान रॅली, संविधान प्रस्ताविका वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर “बुद्ध – भीम – संविधान” यांवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. संविधान प्रास्ताविका वाचन योगेश मेश्राम, निलेश मेश्राम यांनी तर कार्यक्रमांचे संचालन आशिक रामटेके यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालन प्रदीप मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण दुमाने यांनी पार पाडले.
कार्यक्रमाला वामनराव वाघमारे, काशिनाथ गजभिये, भाऊराव गजभिये, ईश्वर ठवरे, मारोती बहादुरे, संगम भिमटे, चरणदास पोईनकर, विनोद बोरकर, भीमाबाई गजभिये, सारूबाई वाघमारे, लिलाबाई बोरकर, सुनीता शेंडे, प्रेमिला गजभिये, वंदना मेश्राम, कविता पाटील तथा सर्व गावकरी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस तसेच धम्म ज्ञान परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण करून अल्पोहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाला बहुसंख्येने गावातील गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close