एक राखी सैनिकांसाठी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 21/07/2022.
पाथरी शहरातील नेताजी सुभाष विद्यालय आणि राष्ट्र सेवा समिती च्या वतीने स्वत: राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना पोस्टाने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवन्यात येणार आहेत.
देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी नेताजी सुभाष विद्यालय पाथरी च्या वतीने ‘ एक राखी सैनिकांसाठी ‘ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी समितीच्या डॉ.मंजुषा चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल, असे डॉ.चौधरी यांनी सांगितले. विद्यार्थ्यां स्वतः राखी तयार करत आसल्यामुळे त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळात आहे.. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना ही मिळेल . त्याचबरोबर देशभक्ती या राष्ट्रीय मूल्याचीही जोपासना होते, असे डॉ मंजूषा चौधरी यांनी सांगितले. शिवराज नाईक यांनी प्रास्ताविक केले.या वेळी मुख्याध्यापक एन.डी.वानखेडे,पर्यवेक्षक ए.जी.वडकर ,एन.आर.गाडेकर,सौ.एस.ए.दातार , राष्ट्र सेवा समितीच्या सौ किर्ती थिगळे,सौ अश्विनी चौधरी,सौ. उन्मेषा कुलकर्णी, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.