लोणी बुद्रुक चा खो खो चा खेळाडू श्री. भागवत कावळे यांची परभणी पोलीस दलात निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथेल अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलाची व कै. मारोतराव धर्मे क्रीडा मंडळ लोणी बुद्रुक चा खो खो चा खेळाडू श्री भागवत कावळे यांची परभणी पोलीस दलात निवड होऊन तो ट्रेनिंग साठी परभणी येथे जात असताना त्याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी गावातील त्याच्या मित्रांनी सत्कार केला तसेच नुकत्याच आलेल्या परभणी पोलीस भरतीच्या त्याच्या ओपन कॅटेगिरी मधून त्याची निवड झाली आहे मागील चार वर्षापासून भरतीची तयारी करत होता घरची हालाखीची परिस्थिती व त्याच्यावरच शेतीची जिम्मेदारी असून दररोज न चुकता कसरत गेली अल्पशा शेतीवर काम करून त्यासाठी खर्च करून अथक परिश्रमातून त्याला हे यश मिळाले आहे यासाठी आई-वडिलांचे सतत त्याला प्रोत्साहन मिळत होते त्याच्या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने व त्याच्या मित्राच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच त्याचा सत्कार करते वेळेस त्याचे मित्र व गुरुवर्य महेंद्र नाना धर्मे विकास धर्मे लक्ष्मण धर्मे अशोक बुरंगे कृष्णा धर्मे भागवत गीराम रामा धर्मे गजानन चामनरू अशोक धर्मे श्याम धर्मे व इतर गावकरी उपस्थित होते .