ताज्या घडामोडी

डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणेचे चान्सलर पी डी पाटील यांची साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ला भेट

डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणेचे चान्सलर पी डी पाटील यांची साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ला भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आदरणीय पी डी पाटील चान्सलर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे यांनी परमपूज्य श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे भेट दिली. परमपूज्य श्री साईबाबांचे श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन साईबाबांच्या पादुकाची पाद्यपूजा केली. पी डी पाटील यांचा श्री साई स्मारक समिती पाथरी ट्रस्टच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने एन के कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यथोचित आदर सत्कार केला. याप्रसंगी पी डी पाटील यांनी “मला अतिशय आनंद झाला . श्री साईबाबांच्या जन्मस्थानी भेट देण्याचा व आशीर्वाद घेण्याचा मोठा योग आला .असाच योग येवो ही प्रार्थना” असे मनोगत व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close