ताज्या घडामोडी
घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे नेरी व नागभीड येथे ‘रक्तचंदनाची शेती’ या विषयावर शेतकरी मेळावा व रक्तचंदनाचे बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन
उप संपादक: विशाल इन्दोरकर
विदर्भातील शेतकरी समृद्ध होऊन त्याची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने प्रेरित होऊन चिमूर तालुक्यातील सातारा येथे घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. याअंतर्गत अनेक विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदत करण्यात येणार आहे.
हरित मित्र परिवार पुणे व घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे उद्या दि. १९ सप्टे. ला चिमूर तालुक्यातील नेरी येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे दुपारी १२ वाजता तसेच बित्तेवार चौक, नागभीड़ येथे सायंकाळी ४ वाजता ‘रक्तचंदनाची शेती’ या विषयावर शेतकरी मेळावा व रक्तचंदनाचे बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी सर्व शेतकरी व उद्योजक तरुण-तरुणींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी आयोजकांकडून आवाहन केले आहे.