ताज्या घडामोडी

जागतिक कीर्तीचे ग्लोबल टीचर रणजीत डिसले सर यांनी मानवत गट साधन केंद्राला दिली भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

सेलू येथील मधुकर काष्टे सर यांच्या पुढाकाराने व केंद्रप्रमुख लोहट सर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत येथे रणजीत डिसले सर यांची ग्रेट भेट पूर्णत्वास आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख लोहट सर, व प्रमुख मार्गदर्शक शिक्षकांचे प्रेरणास्थान रणजीत डिसले सर, तसेच प्रमुख उपस्थिती मधुकर काष्टे सर, श्रीराम घटे सर, बोडखे सर, जाधव सर यांच्यासह मानवत पाथरी व सेलू येथील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटसाधन केंद्र मानवत, पाथरी,सेलू यांच्या वतीने रणजीत डिसले सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.प्रसंगी साने गुरुजी वाचनालय मानवत,राजर्षी छत्रपती शाहू क्रीडा मंडळ मानवत,पाथरी व सेलू येथील शिक्षक वृंदांच्यावतीने रणजीत डिसले सर यांचा सत्कार करण्यात आला. आंबेगाव येथील शाळा बांधकामाच्या निधी संकलणाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलणारे बोडखे सर यांच्या वतीने डिसले सर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव या शाळेस बोडके सर यांच्या मातोश्रीच्या वर्षश्राद्ध प्रीत्यर्थ 35000/-निधी देऊन सरांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला.
नवोदय परीक्षेत यश मिळवलेल्या चिरंजीव यश तसेच मार्गदर्शक शिक्षक नामदेव खिळदकर सर व पालक कोरेबैनवाड सर यांचा डिसले सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डिसले सर यांनी मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला येणाऱ्या शैक्षणिक अडचणीसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. मानवत तालुक्यात सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा मला अभिमान वाटतो.मी अमेरिकेला गेल्यावर व्हिडिओ कॉल द्वारे तेथील शाळा तुम्हाला दाखवील ,आपण मानवत मध्ये करत असलेल्या शैक्षणिक कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत मानवत मध्ये मला मानवता दिसून आली असे विचार जागतिक कीर्तीचे ग्लोबल टीचर आदरणीय रणजित डिसले सर यांनी व्यक्त केले.
डिसले सर यांनी रविवार सुट्टीच्या दिवशी मानवत येथील गटसाधन केंद्रात जमलेल्या शिक्षकांच्या प्रेमाखातर आपले मनोगत व्यक्त केले.
मानवत गटसाधन केंद्रातील वृक्ष लागवड औषधी बाग व मियावाकी गार्डनची त्यांनी पाहणी करून आनंद व्यक्त केला.
प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख शिरीष लोहट सर यांनी केले बहारदार सूत्रसंचालन किशोर तुपसागर सर यांनी केले तर आभार विलास मिटकरी सर यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close