अमरावतीत वर्धापन दिन व गुणगौरव २०२६ कार्यक्रम दिमाखात संपन्न

जिल्हा प्रतिनिधि:अहमद अन्सारी परभणी
(मुक्त पत्रकार एड संतोष शिंदे ) अंबानगरी अर्थात अमरावतीत कलानगरी वेलफेयर सोसायटीचा पाचवा वर्धापन दिन ८ जानेवारी रोजी अमरावती येथे दिमाखात संपन्न झाला. त्याप्रसंगी एड. संतोष शिंदे, पुणे, संस्थापक ~ फैमिली वेलफेयर रिसर्च एण्ड ट्रेनिंग सोसायटी, अध्यक्ष~ पुरूष हक्क संरक्षण समिति, पुणे यांस सामाजिक कार्याबद्दल पुरस्काराने तसेच विशेष सत्कारार्थी श्रीमती इंदुमती गोंडाने, श्रीमती करूणा कदम त्याचप्रमाने सामाजिक व कला, साहित्य क्षेत्रातिल कार्यरत अन्य मान्यवर व्यक्तिना देखिल गौरवीण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रीति साहू,संपादिका ~ वुमेन्स 24 न्यूज चैनल, उद्घाटक सौ अनुष्का बेलोरकर ~ समाजसेविका, विशेष अतिथि ~ श्री विजयकुमार खंडारे ~ सिने कलावंत, बाल कलाकार ~ यश वाकडे, श्री रवि वानखेडे ~ कंटेंट क्रियेटर, प्रमुख पाहुणे सौ जोसना करवाड़े ~ संपादिका दै .युवक आधार विदर्भ, श्रीमती नीलिमा भोजने ~जेष्ठ साहित्यिक, प्रमोद सूर्यवंशी ~ लेखक , कलाकार, तसेच जेष्ठ कलाकार श्री सुधीर पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दीप प्रज्वलन आणि देवीच्या पूजनाने अमरावती मधील राजकमल चौकातिल जोशी हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी कलाकार कसा असावा, प्रेक्षकांची साद कशी त्यावर कलाकाराची कला सिद्ध होते, कला आत्मसात करण्याचे तंत्र स्वतःच विकसित केले की त्यात री टेक येत नाही असे विचार विजयकूमार खंडारे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अन्य अतिथि यानी देखिल आपले विचार मांडले. प्रीति साहू यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाला आपन काय कसे देतो यावरून आपली योग्यता आपल्याला समजते, आपण समाजाचे देने लागतो, याप्रसंगी गाववाला डॉट कॉम या अप्लीकेशन चे विमोचन केल्याने सर्व सामान्य व्यवसाय धारकाला या स्पर्धेच्या युगात नक्की याचा फायदा होईल त्यातुन आर्थिक उत्पन्न वाढेल, येथिल व्यवसाय येथेच वाढेल त्यातून रोजगार उपलब्ध होईल असे विचार त्यांनी मांडले. भारताची कुटुंब व्यवस्था जगात वाखनन्या सारखी आहे, परंतु भरतात मात्र कुटुंब संस्था व विवाह व्यवस्था कोलमडत असल्याने युवा पीढ़ी देखिल विकृत दिशेला जान्याचे प्रमाण वाढत असुन सरकार याकड़े प्रमाणिक स्वरूपत लक्ष देत नसल्याची खंत एड संतोष शिंदे यानी व्यक्त केली.
कार्यक्रमाची प्रस्तावना कलानगरी वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष श्री सागर भोगे यांनी केली, सूत्रांचालन श्री संतोष हांडे यांनी केले. उपाध्यक्ष आशीष सुंदरकर, अमोल कोषकार, भूषण जोंधले, विशाल वानखडे , अनिल मेश्राम आदिनी कार्यक्रमाचे छान पद्धतिने आयोजन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सागर भोगे यांनी केले.









