ताज्या घडामोडी

महिला मुक्ती मोर्चा चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच चिमूर पोलीस स्टेशनला निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

महाराष्ट्रामध्ये महिला व अल्पवयीन मुलीवरील अत्याचार झाल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. या घटना अतिशय दुर्दैवी असून निंदनीय आहेत हे सर्व खटले फास्ट ट्रॅक चालवून आरोपींना फाशीची शिक्षा मिळायला हवी आणि महिलांना न्याय मिळावा याकरिता महिला मुक्ती मोर्चा चिमूरच्या वतीने तहसील कार्यालय चिमूर येथे उपविभागीय अधिकारी तसेच चिमूर पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले,
मुंबई येथील साकीनाका अत्याचार पिडीत महिलेचा मृत्यूशी झुंज देतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच अमरावती जिल्हयातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अल्पवयीन व सात महिण्याच्या गर्भवती मुलीला बदनामीच्या भितीने स्वतःला गळफास लावून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना घडली असून आणखी धक्कादायक घटना उल्हास नगर रेल्वे स्थानकाजवळ १४ वर्षीय मुलीला एका पडक्या खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्या मुलीला वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केला. परंतु त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिल्या गेली असून या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी महिला मुक्ती मोर्चा तर्फे मागणी करण्यात आली, यावेळी महिला मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष नाजेमा पठाण, तालुका सहकारी अध्यक्ष योगेश रामटेके,तालुका सचिव कल्पना बहादुरे,तालुका कोषाध्यक्ष उज्वला खोब्रागडे, तालुका महासचिव आशिष सांगोले,तालुका संघटक शहेनाज अंसारी,तालुका सहसचिव आकाश श्रीरामे, चिमूर शहर अध्यक्ष विलास मोहिनकर, चिमूर शहर उपाध्यक्ष सुनिल हिंगणकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close