अपघातात महिलेचा मृत्यू दुसरा किरकोळ जखमी
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर
चिमूर :- आज दिनांक 01/10/21 रोजी सकाळी 10/55 वाजता सुमारास मौजा कोलारी ता. चिमूर येथील मधुकर गुलाब जोंधुळकर हे आपल्या दुचाकी मोटार सायकल क्रमांक MH 49 BP 9599 या वाहनावर आपली आई सुमनबाई वय 65 वर्ष, हिला मागे बसवून जांभूळघाट वरून चिमूरकडे येत असतांना चिमूर येथील गुरुदेव मंगल कार्यालय समोर समोरून येणारे टँकर आयसर क्रमांक MH 34 BG 1421 च्या चालकाने आपले ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व लापरवाहीने चालवून मोटार सायकलीस धडक दिल्याने अपघात होऊन मोटार सायकलचे पाठीमागे बसलेली फिर्यादीची आई सुमनबाई ही गंभीर जखमी होऊन मरण पावली. सदर घटनेसंबधात पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्रमांक 436/2021 कलम 279, 304(अ) भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख व पोलीस अंमलदार राहुल चांदेकर करीत आहेत.