ताज्या घडामोडी

शिव जन्मोत्सावानिमित्य गड्पिपरी येथे शिव गीतांचा जागर व कवि संमेलनाचे आयोजन

छ. शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व बोद्ध पंचकमेटी गड्पिपरी यांचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधीःराजेंद्र जाधव

गड्पिपरी या गावात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व बोद्ध पंचकमेटी गड्पिपरी यांचे संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून १८ व १९फेब्रुवारीला संगीतमय शिवगीत प्रबोधन कार्यक्रम व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.


१८ फेब्रुवारी ला सायकांळी १० वा.संगीतमय शिवगीत पाबोधन कार्याला सुरुवात झाली.यांमध्ये परिसरातील नामवंत गायक कलावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते .वाद्याच्या तालावर शिव गीताच्या माध्यमातून गावकर्यांना शिवाजी महाराजांची महती, त्यांच्या कार्याचा ,विचाराचा, आवाज जन मनात भिडत होता.यामुळे सर्व वातावरण शिवमय झाल्यासारखे वाटत होते. शिवगीताचा प्रबोधन कार्यक्रम चालू असतानांच १८ फेब्रुवारी ला रात्री ठीक १२ वा. सरपंच मा.श्री.चंदूजी पाटील व उपसरपंच सौ.कल्पना हरडे गट ग्रामपंचायत गडपिपरी यांच्या हस्ते केक कापून व फटाक्याची आतषबाजी करून छ .शिवाजी महाराज महाराजांना अभिवादन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.


१९ फेब्रुवारीला सकाळी ९.०० वा.शिव रॅली बुद्ध विहाराच्या प्रांगणातून काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्ते व चौकातील संत.तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रम स्थळी रालीचे आगमन झाले. त्यानंतर पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषाच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.


“शिवाजी महाराज कि जय ” “जय भवानी जय शिवाजी” अश्या घोषणा देत शिव जन्मोत्सवाचा आंनंद द्विगुणीत करण्यात आला.
या निमित्याने कवी संमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये परिसरातील गायक ,कवी व कलावंत यांनी आपापल्या परीने आपल्या गीतातून ,गायकीतून व कवितेच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची महती गायिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,प्रा.डॉ.आत्मारामजी ढोक जेष्ठकवी,लेखक, साहित्यिक व समीक्षक नागपूर , प्रमुख अतिथी मा.प्रा.डॉ.अविनाश फुलझेले,इतिहास विभाग प्रमुख डॉ.बाबासेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर,मा.जयदीप खोब्रागडे जेष्ठ समाज सेवक, मा.चांदे साहेब पोलीस निरीक्षक भिसी,मा.शुभम मंडपे युवा जिलाध्यक्ष वंचित आघाडी, मा.राजेंद्र जाधव दै.सकाळ पत्रकार, मा.एन आर.कांबळे सर,शिवराजजी मेश्राम, सौ.प्राची दोडके पटवारी मॅडम , मा.लालजी मेश्राम,मा.उद्धवजी मोहोड ,उद्धवजी खाडे,मा.सौ.कविताताई गौरकार ऍड.नितीनजी रामटेके नोटरिष्ट, प्रा.मा.ज्ञानेश्वर ठवरे, गायक प्रा.डॉ.बाळासाहेब बनसोड ,सौ.जयमाला बोरकर ,मा.प्रकाश मेश्राम,रविंद्र पिल्लेवान,सुरेश शेंडे ,शीला शेंडे ,गजानन रामटेके ,विभाताई गजभिये,मन्साराम रामटेके रामटेके मॅडम,बन्सोड मॅडम,शुभांगी खोब्रागडे,संतोष बारसागडे,प्रकाश वाळके,वृंदा मेश्राम,कृष्ण डांगे ,रामचंद्र गेडाम ,गोवर्धन मंडपे,नीलिमा जाधव.प्रतिमा लोखंडे ,कैलाश रामटेके, दयाळ गेडाम,बोरकर साहेब,बोरकर मॅडम, सौ.सविता मोहोड,पत्रू पाटील, मिलिंद पाटील, प्रफुल पाटील,इ .पाहुणे, व गावातील महिला, पुरुष, बालगोपाल व सर्व शिवप्रेमी यांनी आपली उपस्थिती दर्शविली.
अश्याप्रकारे गड्पीपरी येथे शिवाजी महाराजांच्या विचाराची खरी शिव जयंती साजरी करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close