ताज्या घडामोडी

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी येथे आढावा बैठक संपन्न

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी विधानसभा चे आमदार माननीय श्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत. प्रकल्प कार्यालय अंतर्गत मागास वर्ष कल्याण योजना मध्ये सन 2021- 22 येणाऱ्या योजना योजनांच्या अंमलबजावणीसाठी आढावा आश्रम शाळा व्यवस्थापन ,वस्तीगृह न्यू कलर चे बजेट तसेच शेतकऱ्यांसाठी वीजपंप तेल पंप पुरवीने व इतर योजना व बाबत चर्चा करण्यात आली.

या दरम्यान समितीचे नवनियुक्त सदस्य नियुक्ती झालेले अध्यक्ष व माननीय अशासकीय सदस्यांची उपस्थिती मध्ये प्रकल्प कार्यालय मध्ये येणारा योजना आदिवासी बांधव पर्यंत कोणत्या प्रकारे पोहोचवण्यात येईल यामध्ये सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आले .या दरम्यान एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे अहेरीचे अधिकारी श्री.अंकित गोयल ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) समितीचे सदस्य शोभा येलाम ,निलेश वेलादी , श्री.कुत्तरमारे, करीयला मडावी, दिलीप सुरपाम, अशासकीय सदस्य बिरा आत्राम, अशोक आत्रम तसेच प्रकल्प अंतर्गत येणारे सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close