धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमीच्या निमित्याने समाजप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम व मिरवणूक रॅली संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाच लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.हा दिवस भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस म्हणून साजरा केल्या जात आहे.
याच दिवसाचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,नगराशाखा विठ्ठलवाडा च्या वतीने दिनांक 14 ऑक्टोबर 2021 ला बुद्ध विहार परिसरात समाजप्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये विठ्ठलवाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मान.उराडे सर तसेच गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अनिकेत दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनुवर्तन दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी उत्तम असे नृत्य करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान.के. डी. मेश्राम साहेब तहसीलदार गोंडपिपरी, उद्घाटक म्हणून मान.मोरेश्वर दुर्गे अध्यक्ष भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखा गोंडपिपरी,प्रमुख मार्गदर्शक मान.रुपेश निमसरकर सर, मान.राजू झाडे, मान.नितेश डोंगरे, रेखाताई वाकडे, रोजा झाडे मॅडम, मान.अनिकेत दुर्गे उपस्थित होते.
तसेच अशोक विजयादशमीच्या निमित्याने सकाळच्या सुमारास झेंडा वंदन करण्यात आले त्यानंतर विठ्ठल रुखमाई देवस्थान कमिटीतर्फे सर्व समाजबांधवांना भोजनदान देण्यात आले.आणि सायंकाळला अशोक विजयादशमीची मिरवणूक रॅली काढण्यात आली.