शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया
चिमूर तालुका शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शेतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेता चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया अशी मागणी शिवसेना चिमूर तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजने अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु लगेच सरकार कोसळले त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली व त्यावेळेस शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी असलेले शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा शिंदे सरकारने केली असून, अजुनपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी हा योजनेपासून वंचित राहिला. याकरिता 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी केली. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा शिवसेनेचे च्या वतीने देण्यात आला.
यावेळी चिमूर विधानसभा समन्वयक भाऊराव ठोमबरे, माजी उपजिल्हा प्रमुख हरिराम् दहीकर, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर नीवटे, प्रसिध्दी प्रमुख सुनील हिंगनकर, शहर प्रमुख सचिन खाडे. संजय वाकडे, नितीन लोनारे. संतोष कामडी, नामदेव नेऊलकर उपस्थित होते.