ताज्या घडामोडी

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमुर

आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याची हेडसांग होत आहे. कुणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही विशेषता महिलांमध्ये हिमोग्लोबीन, कॅल्शियम ,लोह यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असते. ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. रक्त तपासणीचे खर्च जास्त होत चालल्यामुळे चाचण्या करत नाहीत म्हणून हीलींग टच हॉस्पिटल चिमूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले .या शिबिराचे उद्घाटन राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी चिमूर विधानसभा समन्वयक भावराव ठोंबरे, तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर पंचभाई ,हिलिंग टच हॉस्पिटल संचालक साईनाथ बुटके, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, महिला तालुकाप्रमुख माधुरी केमये, तालुका संघटक रोशन जुमडे, महिला आघाडी शहरप्रमुख रश्मी डाहुले, युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, शहर प्रमुख रोहन ननावरे, जगदीश मुरकर, वैशाली बिसेन, स्नेहा भिमटे, मंजुषा सावसाकडे, विशाखा निमगडे, विषय डांगले, रवींद्र तामगडे, प्रमोद वाघमारे, भारती वाघमारे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close