पाथरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि .14 जानेवारी 2022 शुक्रवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पाथरी च्या वतीने साजरा करण्यात आला याप्रसंगी सकाळी नऊ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक वंदना घेण्यात आली व नामांतर लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष प्रज्ञाकर मुळे सर, पालक मंत्री एन के पैठने ,सरचिटणीस परमेश्वर धनले साहेब, हिशोबनीस एस जी कांबळे सर, सचिव एम बी गायकवाड, डॉ जाधव साहेब ,वामनराव साळवे, महिला उपाध्यक्ष सुशीलाताई मनेरे ,सचिव इंदूताई वाकडे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखाताई मनेरे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि शहर शाखेचे अध्यक्ष विलास ढवळे, दिलीप घागर माळे इत्यादी उपासक-उपासिका उपस्थित होते.