व्येंकटापूर येथील ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत आविसचे दोन उमेदवार मताधिक्याने विजयी

पोटनिवडणुकीत तीन पैकी दोन जागा आविसकडे
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा तालुक्यातील व्येंकटापूर ग्राम पंचायतीच्या तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली यात आविसचे दोन उमेदवार मताधिक्याने विजयी झाले तर एका उमेदवाराचे निसटता पराभव झाला.

निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पोसक्का अल्लूरी,पेंटीं तलांडी यांच्या समावेश असून आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा येथील बस स्थानक चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केले.
ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनियुक्त सदस्यांना आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम,सरपंच अजय आत्राम,उपसरपंच मंजूला दिकोंडा, अंकुलू जनगम,आविस सल्लागार रवी सल्लम,माजी नगरसेवक नरेशकुमार अलोने,मडे केशव,रमेश शिवराला, दिकोंडा श्रीनिवास,चिंना पेंटा तलांडी,ब्रह्मय्या कावरे,बापूराव चंद्रगिरी,सोमा वेलादी,जिल्लापेल्ली राजलींगु, वेंकटी वेलादी, गोपाल गड्डी, अल्लूरी सडवली,अंजली गड्डी,रोहन अल्लूरी,गुप्ता वेलादी,जनार्धन जुनगरी, नागेश मोरला आदींनी शुभेच्छा दिले.