ताज्या घडामोडी

तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊन चिमूरात शिवसेनेला पडली खिंडार

चिमूर तालुक्यातील “शिवसेनेच्या वाघाचा” राजीनामा.

मुख्य संपादक: कु.समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख असणारे व शिवसेनेचा वाघ समजणारे श्रीहरी सातपुते यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून चिमूर तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडली आहे.
शिवसेनेचा दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, आपण माझ्यावर एक वर्षापुर्वी शिवसेना चिमुर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. व त्या दिवसापासून मी आपणास अभिप्रेत असलेले कार्य संपूर्ण तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे.
आपण ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे पण आपल्या विश्वासास पात्र ठरलो नाही. आपल्याला अभिप्रेत असलेले चिमुर तालुका प्रमुख म्हणून कार्य किंवा जबाबदारी मी योग्य रितीने पार पाडत नाही, असे मला वाटते. असे दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
म्हणून मी माझा चिमुर तालुका शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सोपवत आहे. त्याचा स्विकार करावा. असे दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
याबाबत माझी मुखमंत्री उद्धव ठाकरे, गजानन कीर्तीकर शिवसेना नेते तथा खासदार,
अनिल देसाई शिवसेना सचिव तथा खासदार, प्रकाश वाघ, शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक प्रशांत कदम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख, आशिफ बागवान, विधानसभा संपर्क प्रमुख, मुकेश जिवतोडे चंद्रपूर जिल्हा प्रमुख यांच्याकडे दिलेल्या राजीनाम्याची प्रत पाठविली असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपूते यांनी मीडिया जवळ सांगितले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close