ताज्या घडामोडी

हिस्वन खुर्द ता. जि. जालना येथील आदिवासी पारधी समाजावरील अत्याचार प्रकरणी मानवी हक्क अभियान चे मुख्यमंत्र्याना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी. दिनांक 7मार्च
मौजे हिस्वन खुर्द येथील गट नंबर ८३ मधील आदिवासी पारधी समाजाची दिनांक 22/०२/२०२२ रोजी रात्री २:०० वाजण्याच्या सुमारास आदिवासी पारधी समाजाच्या जवळपास ३० घरे हिस्वन खुर्द, इस्लाम वाडीचे, थेरगाव येथील बेकायदा समूहाने जाळून उध्वस्त केली आहेत. पारधी समाजाची राहती घरे आणि घरातील सर्व संसार उपयोगी साहित्याची जाळपोळ केल्यानंतर जालना पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद देत असताना आम्ही सांगत असलेल्या आरोपींची नावे ठाणे अंमलदार आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक FIR मध्ये दाखल केलेले नाहीत.
घरांना आगी लावल्या त्यावेळी पारधी समाजाची मंडळी लेकरा बाळा सहित घरामध्ये झोपली होती. आगीच्या गरमीने त्यांना जाग आल्याने ते उठले. या घटनेमध्ये खूप मोठा अनर्थ टळला आहे. जीवित हानी झालेली नाही.
मौजे हिस्वन खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, जालना तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तहसीलदार जालना यांनी हिस्वन खुर्द, इस्लाम वाडी, आणि थेरगाव येथील लोकांच्या म्हणण्यानुसार आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबांनी गावरान जमीन सोडून जावे म्हणून त्यांचे घराचे अतिक्रमण आहे असे समजून बेकायदेशीर जाहीर नोटीस काढून घरे मोडून टाकण्याची कार्यवाही करत आहेत. आदिवासी पारधी समाजाच्या कुटुंबांना हुसकावून लावण्याच्या कट करत असतानाच वरील तीन गावच्या ३० ते ४० लोकांच्या जमावाने दि. २८/०२/२०२२ रोजीच्या रात्री २:०० वाजता त्यांना जाळून मारण्याचा कलेला प्रयत्न निषेधार्थ आहे.
दिनांक २८/०२/२०२२ च्या रात्री आगीपासून वाचलेल्या झोपड्या वरील तीन गावच्या लोकांसह ग्रामसेवक, सरपंच, महसूल कर्मचारी, पोलिस यांनी बळाचा वापर करून दि. १ मार्च २०२२ रोजी मोडून पसारा टेम्पो भरून घेऊन गेले आहेत. मौजे हिस्वन खुर्द गट नंबर ८३ मधील राहातं असलेल्या पारधी समाजाला ठेवायचे नाही असे ठरवून हिस्वन खुर्द, इस्लाम वाडी, आणि थेरगाव येथील नागरिक, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाणे जालना येथील कर्मचारी यांनी संगनमताने पारधी समाजाच्या संसाराची राख रांगोळी केली आहे.
हिस्वन खुर्द येथील गट नंबर ८३ मधील गायरानावर पारधी समाजाचे अतिक्रमण नसून त्यांच्या मालकी हक्काची ५ हेक्‍टर ६० आर जमीन आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून ते राहतात. सध्या हिस्वन खुर्द इस्लाम वाडी आणि थेरगाव या तीनही गावातील लोक पारधी समाजाला कोणीही किराणा सामान, दळण आणि मजुरी देत नाहीत. जालना शहरातून भीक मागून आणून लेकरांना जगवण्याचे चालू आहे. पारधी समाजाची कुटुंबातील सर्वच महिला पुरुष लेकरा बाळासह सध्या उघड्यावर उपासमारीचे दिवस काढत आहोत.
तरी मेहरबान साहेबांना विनंती आहे की, आदिवासी पारधी समाजाच्या अत्याचार प्रकरणी खालील प्रमाणे त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा ही विनंती.

मागण्या खालील प्रमाणे आहेत
१) हिस्वन खुर्द येथील पारधी समाजावर अत्याचार करणारे सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
२) मोजे हिस्वन खुर्द येथील अत्याचारग्रस्त घरांचे पंचनामे करून सर्व महिला पुरुषांचे जबाब नोंदवून घेण्यात यावेत.
३) दिनांक २८/०२/२०२२ रोजी पोलीस स्टेशन तालुका जालना येथे दाखल असलेल्या एफ आय आर नंबर ००८९ मध्ये ताबडतोबीने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कायदेशीर कलमे समाविष्ट करावीत.
४) मौजे हिस्वन खुर्द अत्याचारित कुटुंबांना ताबडतोबीने प्रशासनाने आर्थिक मदत करावी.
५) मौजे हिस्वन खुर्द गट नंबर ८३ मधील आदिवासी पारधी समाजाची घरे मोडून टाकण्यासाठी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या बेकायदेशीर कार्यवाही संदर्भाने दोषी शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
६) मौजे हिस्वन खुर्द गट नंबर ८३ मधील अत्याचार ग्रस्त पारधी समाजाच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.
७) मौजे हिस्वन खुर्द गट नंबर ८३ मधील आदिवासी पारधी समाजाला पिण्याचे पाणी, लाईट रस्ते अशा सर्व नागरी सुविधा ताबडतोबीने देण्यात याव्यात.
८) मौजे हिस्वन खुर्द गट नंबर ८३ मधील सर्वच बेघर अत्याचारग्रस्त आदिवासी पारधी कुटुंबांना प्राधान्य क्रमाने शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावेत. अदी मागण्या मान्य झाल्या तर ठिक अन्यथा मानवी हक्क अभियान च्या वतीने राज्यभर तीव्र अंदोलन करण्यात येइल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर पप्पुराज शेळके रघुनाथ कसबे दादाराव कांबळे,सरस्वती पवार , देविदास कांबळे , संतोष करवंदे, दीपक भालेराव आदीच्या स्वाक्ष-या आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close