ताज्या घडामोडी

आरोग्य शिबिरचा १५१ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील पोहेटककळी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात शाळेतील एकुण १५१ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहेटाकळी येथिल शाळेत पत्रकार लक्ष्मण उजगरे यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायतचे सरपंच शामराव गोंगे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर गोंगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गणेश बागल उपसरपंच, आझमखान पठाण ग्रामसेवक,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कल्यान गोंगे,अशोक उजगरे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब गोंगे आदींची उपस्थिती होते.
यावेळी आरोग्य तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ ईक्कर,अधिपरीचारीका द्रोपदी ढगे,औषध निर्माण अधिकारी आशेफ सिद्दीकी व आरोग्य सेविका खरवडे आदींनी तपासनी केली.यामध्ये शाळेतील १५१ विद्यार्थ्यांची तपासनी करण्यात आली.तर २१ विद्यार्थ्यांची कीरकोळ उपचार करण्यात आली.त्याच बरोबर ११ विद्यार्थ्यांना पुढील तपासण्या व उपचारासाठी जिल्हा रुग्णालय परभणी येथे पाठवण्यात येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ ईक्कर यांनी दीली आहे.
तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अजित खारकर यांनी केले तर सुत्रसंचलन रतन कदम यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक डांबे सर,मिशे सर,शिंदे सर,गोरे सर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी परीश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close