सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्याकडून निरोप देण्यातआला. या कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वर्ग सातवीच्या वर्गशिक्षिका किरण वाडीकर मॅडम,राजूरकर मॅडम,आशिष गोंडाने सर,भानारकर सर,जिवतोडे सर.वीर मॅडम,वाढई मॅडम,राऊत मॅडम यांची उपस्थिती होती. संस्थाध्यक्ष संजयजी गजपुरे हे काही कारणा मुळे उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी फोनवरून सातवीतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली . वर्ग सहावीच्या मुलींनी स्वागतगिताने पाहुण्याचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उदघाटक व सर्व प्रमुख अतिथी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी च्या विद्यार्थिनींनी समूह नृत्यातून तसेच एकल नृत्यातून निरोप दिला. यांनतर सातवीच्या विदयार्थिनींनी फॅशन शो च्या माध्यमातून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थिती मध्ये सरस्वती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सातवीच्या विद्यार्थ्याकडून शाळेला भेटस्वरूप भेटवस्तू दिली,शाळेच्या वतीने सुद्धा सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या.
सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता गोड जेवणाने झाली. सदर कार्यक्रमाचे संचालन वर्ग सहावीची विद्यार्थिनी कु. मितन विलास मेश्राम हिने केले तर आभार अक्षय मेंढे याने मानले.