शिक्षण, आरक्षण, संरक्षणासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती मानवत यांच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मुस्लिम समाजाच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी मानवत शहरात दि.२२ ऑक्टोबर २०२३ रविवार रोजी ११ वाजता शिपाई फंक्शन हॉल बांगड प्लाट येथे मुस्लिम आरक्षण संरक्षण व शिक्षण संघर्ष समिती मानवत यांच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कसे वाढविता येईल, आरक्षणाच्या मागणीसाठी शासनावर कशाप्रकारे दबाव वाढविता येईल याविषयी चर्चा करण्यात आली.
या तालुकास्तरीय बैठकी मध्ये तालुका व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विचारवंतांनी सहभाग नोंदविला.
या तालुकास्तरीय बैठकी मध्ये रफिक सर, नितीन सावंत सर, वहीद पटेल, महेमुद शेख सर, समाजसेवक अनंता मामा भदर्गे, सय्यद जमिल, हबीब भडके, नियामत खान, रिजवान बागवान, नजात सर, रूढी गावाचे सरपंच मुसा भाई कुरेशी, पालोदी गावाचे उप सरपंच तौफिक खान, मंगलुर गावाचे सरपंच जमीर पठाण, व मानवत तालुक्यातील सर्व युवा, शिक्षक, वकील, डॅक्टर, नगर सेवक, पत्रकार, सरपंच उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोबीन कुरेशी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन असद खान यांनी केले.