ताज्या घडामोडी

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घ्या – मनविसे

वरोरा तहसीलदार मार्फत शिक्षण मंत्र्यांना निवेदन.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा-मागील दोन वर्षांपासून सूरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे महाविद्यालयातील अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे .कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी शासनाकडून सतर्कता पाळण्यात येत आहे. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल अशी चर्चा असल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांमुळे महामंडळाच्या सर्व बसेस बंद आहे .अश्यातच जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन घेतल्या जाणार असेल तर विद्यार्थी महाविद्यालयात पोहचण्यात मोठी अडचणी येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने च घ्याव्या असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वरोरा तर्फे शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार मॅडम रोशन मकवाने यांच्या मार्फत देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी,तालुका सचिव कल्पक ढोरे, मनवीसे तालुकाध्यक्ष अभिजित अष्टकार ,कपिल बांदुरकर, रितिक चिंचोलकर, अनिकेत जुनघरे , योगेश ताजने, संस्कार कोरेकर , आशिष फुसे,गणेश मांडवकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close