फुटपाथवर राहणाऱ्या महिलांकडून राखी बांधून आदर्श निर्माण केला
उपसंपादक:विशाल इन्दोरकर
राखी म्हटल तर बहिनभावांना जोडून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी हा सण खरच वेगळा आहे. आपण तर आपल्या बहिनी कडून राखी बांधतोच पण सहजा सहजी कधी विचार सुद्धा येत नाही की फुटपाथवर राहणाऱ्या भटक्या जमातींच्या महिलांकडून राखी बांधावी म्हणून . पण ते करून दाखवले सुनिल जनबंधु व अनिल शेंदरे यांनी.
सुनिल जनबंधु हे आपल्या संस्थेच्या ( मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहुउद्देशीय संस्था ) माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक कार्य करतांना दिसतात.
संस्थेचे संस्थापक / सचिव सुनिल जनबंधु व संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शेंदरे यांनी रक्षाबंधन दिवशी फुटपाथवर राहणाऱ्या भटक्या जमातींच्या महिलांकडून राखी बांधून एक प्रकारे त्यांनी आगळावेगळा आदर्श निर्माण केला. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्याना खाऊ , केळी , व कपडे देण्यात आले . त्यावेळी तेथीत महिलांनी आमच्या फुटपाथवर राहत असूनसुद्धा राखी बांधल्यामुळे आंनद व्यक्त केला.