सुनिल जनबंधु यांनी संस्थेतर्फे दिला अभ्यासासाठी काॅंम्पूटर टेबल
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
मातोश्री शकुंतला मनोहर जनबंधु बहुउद्देशीय संस्था ही दिवसेंदिवस आपल्या चांगल्या कार्याची दखल देत आहे . संस्था ही अनाथ, अपंग , विधवा , कुष्ठरोगी अशा गरीब गरजू वंचितांसाठी कार्य करते . त्यामुळे गरजूंना जमेल तसे आवश्यक गरजा पूर्ण करण्याचे प्रयत्न करते.
नागपूर येथील झोपडपट्टीत राहात असलेल्या श्री दामोदर चकोले हे आपल्या परिवाराबरोबर किरायाने राहतात. त्यांचा मुलगा अपंग ( विकलांग ) आहे , त्यासाठी मुलाच्या औषधोपचार योग्य व्हावा व त्याच्यासाठी आवश्यक गरजा मिळाव्यात यासाठी नागपूरला येऊन मजुरी करतात . त्यांना दोन मुली , एक विकलांग मुलगा व पत्नी असे कुटुंब आहेत. मुलगी दहाव्या वर्गात शिकत असल्याने तिला अभ्यासासाठी संस्थेचे संस्थापक, संचालक तसेच सचिव सुनील जनबंधु यांनी संस्थेतर्फे काम्पुटर टेबल दिले. त्यामुळे त्यांच्या परिवारात आनंदाचा क्षण निर्माण झाला. त्यासाठी दहाव्या वर्गात शिकत असलेली मुलगी यांनी अभ्यासाला टेबल मिळाला म्हणून आनंद व्यक्त केले.