भाजपाचे आंदोलन ही राजकीय नौटंकी, आरक्षण कपात करण्याचा अध्यादेश देवेंद्र फडणवीसांचाच
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचा आरोप
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
भाजपाने सध्या ओबीसी आरक्षनावरुन राज्यात आंदोलन उभी करत महाविकास आघाडीवर आरोप करण्यास सुरुवात केली, मात्र ही निव्वळ फडणवीसांची नौटंकि असून ओबीसीचे राजकीय आरक्षण कपात करण्याचा अध्यादेशं फडणवीसांचाच होता,
राज्यात ओबीसीच्या राजकीय आरक्षणात कपात करनयाचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार ने 2 आगस्ट 2019 रोजी घेतला होता आणि त्याबाबतचा अध्यादेश जारी केला होता, सर्वोच्च न्यालयाचच्या निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे स्वता फडणवीस यानी सांगितले होते, इतर मागसवर्गीय (ओबीसी) राज्यात सरसकट 27 टक्के आरक्षण दिले जाते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टकक्यापेक्षा जास्त आरक्षण असु नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दील्यामुळे ही चौकट। पाळताना सरकारने 31 जुलाई ला अध्यादेश जारी करत ओबीसीच्या आरक्षणात कपात करण्यात येत असल्याचे स्वता जाहिर केले होते, आणि देवेंद्र फडणवीस आता स्वता ओबीसीचे आरक्षनासाठी रस्त्यावर उतरून ओबीसीची दिशाभूल करीत राज्य सरकार वर स्वताच्या अपयाशयच खापर फोडन्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे फडणवीस ह्याची ही सर्व नौटंकी आहे, असा आरोप महाराष्ट प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यानी केला आहे