ताज्या घडामोडी

खनिकर्म विभागाच्या पथकाचा रेती तस्करास दणका: भल्या सकाळी पकडले अवैध रेतीचे वाहन

खनिज निरीक्षक दिलीप मोडकेंने केली कारवाई ; रेती माफियांत उडाली खळबळ .

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर शहरातच नाही तर या जिल्ह्यात वाहनांनी रात्रीला अवैध रेती चोरुन नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.सोबतच या बाबतीत लोकांच्याही तक्रारी होवू लागल्या होत्या. जिल्ह्यातील अवैध रेती चोरीवर अंकुश बसावा या मुळ उद्देशाने चन्द्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसिलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर फिरते पथक तयार करून अश्या अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अश्या सुचना या पूर्वीच दिल्या होत्या.रात्रीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही माहिर रेती तस्करांनी रेती नेण्याचा धडाका लावला होता.याच रेती माफियांनी मोठ्या शिताफीने अवैध रेती नेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिवस रात्र पाळत ठेवण्यासाठी त्यांनी रोजीच्या व्यक्तींची नेमणूक केली असल्याची चर्चा देखील ऐकावयास मिळाली .पण या सर्व बाबीवर मात करीत गुप्त माहितीच्या आधारे काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिव धोक्यात घालून मध्यरात्री रेतीचे अवैध रेतीचे वाहने पकडले हे तेव्हढेच खरे आहे.दोन तीन दिवसांपूर्वी चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार डॉ.सचिन खंडाळे घूग्घूसचे मंडळ अधिकारी किशोर नवले, मंडळ अधिकारी किरण मोडकवार व त्यांच्या महसूल पथकाने शेणगांव येथे अवैध रेतीचे वाहन पकडले व ते दंडात्मक कारवाई साठी तलाठी कार्यालय घूग्घूस येथे जमा केले.अश्यातच हे कारवाईचे सत्र सुरू असताना चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाचे खनिज निरीक्षक दिलीप मोडके भौ.मा.प्र.खेलचंद्र वनकर ,व वाहन चालक मनोज जिवतोडे यांनी ताडोबा मार्गावरील किटाडी फाटा येथे आज शनिवार दि.३फेब्रूवारीला भल्या सकाळी अवैध रेतीचे वाहन पकडले.या वाहनाचा क्रमांक MH-34 AB 7090 असा असून वाहन मालकाचे नांव महादेव बर्डे असल्याचे समजते.सदरहु वाहन सुरज चुरा हा चालवित होता .या वाहनांची खनिकर्म विभागाच्या पथकाने तपासणी केली असता रेती आढळून आली .परंतू वाहन चालकाजवळ रेती वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे पथकाने रितसर पंचनामा करीत ते वाहन दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.उपरोक्त वाहन पकडण्यासाठी पथकाने पहाटे पासून त्या वाहनावर पाळत ठेवली होती.शेवटी त्यांचे प्रयत्नाला यश आले.या कारवाई मुळे रेती माफियात खळबळ उडाली आहे.चंद्रपूर शहरातही अवैध रेती चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले आहे.खनिकर्म विभागाने या कडेही तेव्हढेच जातीने लक्ष पुरवावे अशी चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे.या शिवाय जिल्ह्याच्या बल्हारपूर तालुक्यातही अवैध रेती चोरुन नेण्याचे प्रकार वाढले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.या भागातही खनिकर्म विभागाच्या पथकाने दौरा करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यास जनता केलेल्या कारवाईचे निश्चितच स्वागत करतील .पर्यायाने शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close