ताज्या घडामोडी
डोंगरगाव व नवखळा येथे ई- पिक अॅपचे प्रात्यक्षिक

तालुका प्रतिनिधी : कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
नागभीड शासनाच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर शेतकर्यांच्या शेत पिकाची नोंद शेतकर्यांना घेता यावा असे नवीन अॅप शासन स्तरावर काढून गावागावात तलाठी ई पिक पाहणी मोहीम राबवीत आहेत.
शेतकर्यांना आपल्या पिकांची नोंद स्वतः करता यावी व वारंवार तलाठी कार्यालय चकरा मारण्याची गरज पडु नये , म्हणून शासनाने ई- पिक पाहणी मोबाईल अॅप निर्मिती केली. त्याबद्दल प्रचार ,प्रसार व प्रात्यक्षिक तसेच अॅप कसे चालवायचे याबाबत डोंगरगाव व नवखळा येथील तलाठ्यांनी शेतकर्यांच्या शेतात जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डोंगरगाव हलक्या तलाठी चेत्रूरवार , नवखळ्याचे तलाठी मुन व दोन्ही गावचे शेतकरी उपस्थित होते.