ताज्या घडामोडी

कूलजमाती-तंजीम कडून उत्तर प्रदेश सरकारचा पाथरीत निषेध

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी : – मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांना उत्तर प्रदेशात अटक झाली. या अटके प्रकरणी पाथरी येथे कुल-जमात-तंजीमने अटकेच्या प्रकरणाचा निषेध केला आहे.
कूल’ जमाते-तंजीमने ( 24 ) सप्टेंबर रोजी पाथरी येथे तहसील प्रशासनाला निवेदन दिले आहे. उत्तरप्रदेश सरकार कडून करण्यात आलेली कार्यवाही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढील काही काळात उत्तर प्रदेशात निवडणूक होणार आहे. यात मतांचे ध्रुवीकरण व्हावे, यासाठी योगी सरकार राजकीय हेतूने वागत आहे. तसेच जाती जाती मध्ये भेद, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल झालेले कथित गुन्हे मागे घ्यावेत आणि या सर्वांना तत्काळ सोडण्यात यावे. अशी मागणी निवेदनात केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनात्मक अधिकार आहे जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वस्तुस्थिती विचारात न घेता तपास यंत्रणांना पुढे केले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारवर एटीएसचा गैरवापर केल्याचा आरोप निवेदनात नमूद केला आहे.
कुलजमाते तंजिमकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तहसिलदार यांच्याद्वारे निवेदन पाठवण्यात आले. निवेदनाच्या शेवटी हाफिस अब्दुल जब्बार, अब्दुल नईम अन्सारी, शफीयोदीन फारोखी,शेख तन्वीर आदींसह इतरांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. व महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण या संघटणे कडुन पण माहामहीम राष्टपती यांना उपविभागिय अधिकारी व तहसिलदार याच्या मार्फत निवेदन देण्यात आले या वेळी प्रदेश संघटक अहमद अन्सारी प्रदेश महासचिव शेख अजहर हदगावकर अयुबखाॅन अन्वर खाॅन रईस कुरेशी ईफतेखार बेलदार ई स्वाक्षरीया आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close