ताज्या घडामोडी

महापुरुषांना जातीपुरत बांधून ठेवणं हे पापच- ह भ प रोहिदास महाराज म्हस्के

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महापुरुषांच्या कार्याला कसल्याही मर्यादा नसतात. तरीपण आपण त्यांना आपल्या जातीपुरते मर्यादित करतो. असे करून एक प्रकारे आपणं पापच करतं असल्याच मत ह भ प रोहिदास महाराज मस्के बामणी कर यांनी गुरुवारी कीर्तनात व्यक्त केले.
ते दत्तोबा संस्थान दत्तवाडी, शंकरवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवशी ची कीर्तन कथा सांगताना बोलत होते. पुढे बोलताना हभप मस्के महाराज म्हणाले की महापुरुष आणि संत दोन्ही सारखेच. दोघांनीही जगाच्या कल्याणासाठी कार्य केले.

पण आपण सर्वसामान्य माणसं राजकारणासाठी महापुरुष व संताचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत .पण ते चुकीच आहे. युवकांनी व्यसनापासून दूर राहावे आणि लाज न बाळगता छोटा-मोठा व्यवसाय करावा असे आवाहनही त्यांनी केलं. दत्तवाडी संस्थानाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केलं. या गावाला जाणारा रस्ता व्यवस्थित झाल्यास दर गुरुवारी आरती च्या या दिवशी या ठिकाणी बससेवाही सुरू केली जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बससेवा सुरू करण्याचा केलेला प्रयत्न रस्त्यामुळे अयशस्वी झाला असून यापुढे ग्रामस्थांनी देवस्थान चे नाव मोठं करण्यासाठी एकत्र यावे असेही ते म्हणाले. यावेळी ह भ प भागवत कथाकार संतोष महाराज शास्त्री, संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,राजेश कांबळे अनिरुद्ध महाराज कदम , पिंटू महाराज गायळ .
केशव महाराज मुलगीर दत्तवाडीकर .श्रेयश महाराज मुलगीर .भागवत महाराज कदम ,.योगगुरू प्रकाशजी डिकळे सर .बाळासाहेब बचाटे वडगावकर, मृदुंगाचार्य विनायक महाराज मुलगीर, नवनाथ महाराज गुंडेकर उपस्थित होते. पंचक्रोशीतील दत्तभक्त मोठ्या प्रमाणात कीर्तनासाठी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close