ताज्या घडामोडी

शाळापूर्व तयारी मेळावा (जि. प. उच्च प्रा. शाळा आनंदवन वरोरा )

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली मध्ये स्टार्स प्रकल्पाला समाविष्ट केले आहे.त्याच अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व राज्य शासनाने संयुक्त सहभागाने यावर्षी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येत आहे.याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून करण्यात आलेली आहे.

वरोरा शहर लगत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे 16 एप्रिल 2022 ला शाळापूर्व तयारी मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले.सदर मोहीमेची
जनजागृती व्हावी यासाठी लेझीम पथकासह प्रभातफेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेमदास हेमने हे होते,तर प्रमुख अतिथी आनंदवन ग्रा.प.च्या सरपंचा रूपवती दरेकर ह्या होत्या ,प्रमुख पाहुणे शाळा व्य. समितीचे उपाध्यक्षा नीता सोनवाणे,
सदस्या सारिका सावसाकडे,शिल्पा राऊत,मंदा परके, यांची उपस्थिती होती.
मेळाव्यात सात स्टॉल लावण्यात आले.यामध्ये नोंदणी करणे,शारीरिक विकास,सामाजिक व भावनात्मक विकास,बौद्धिक विकास,गणन पूर्व तयारी,मार्गदर्शन,भाषा विकास, सदर स्टॉवर मुलांच्या पालकांना मुलांचे वजन मोजणे,मातेला कार्ड देणे,चित्रात रंग भरणे,कागदाची होडी तयार करणे,लहान मोठा फरक ओळखणे,जोड्या लावणे,परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,स्वच्छ व नीटनेटके बोलणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून लिहिणे,अंक ओळखणे,वस्तू ओळखणे,आदि बालकांना प्रत्येक गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी साहित्यांचे स्टॉल लावण्यात आले होते . प्रत्येक साहित्यांची माहिती शाळेचे शिक्षकांनी मुलांना व पालकांना दिली .मुलांना शाळेविषयी
जिव्हाळा निर्माण व्हावा आणि मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण व्हावी हा एकमेव उद्देश असून मुलांना कार्ड किट देण्यात आली.तसेच शाळेतील पहिले पाऊल हे पुस्तक विकासपत्राबरोबर दिल्या जाणार आहे.
मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वसंत दुधपचारे सह घागी सर,मेश्राम सर,मुरस्कर सर,उमाटे सर,अर्चना मॅडम,अनिवाळ मॅडम,आत्राम मॅडम,मगरे मॅडम या शिक्षकवृदांचा सहयोग होता.

————–———————————–

मागील दोन वर्षांपासून कोविड 19 च्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला.पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्र देखील बंद आहेत,त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलीत दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही.त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होणेपूर्वी शिक्षणाची आनंददायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी सदर अभियान मदत करणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close