ताज्या घडामोडी

कर्तव्यनिष्ठ सेवेला भावपूर्ण सलाम

कर्तव्यनिष्ठ सेवेला भावपूर्ण सलाम

पंचायत समितीतील परिचर मोहम्मद सुलेमान यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ उत्साहात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पंचायत समिती कार्यालयात अनेक वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणारे परिचर मोहम्मद सुलेमान मोहम्मद सुल्तान यांच्या नियत वयोमानानुसार सेवा निवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन दि. 29 मे रोजी पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रशासन अधिकारी बालासाहेब फड होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ प्रशासन अधिकारी संध्या वडकुते, कृषी विस्तार अधिकारी संदिपान घुंबरे, सांख्यिकी विस्तार अधिकारी सुमित वाघमारे यांची उपस्थिती होती.यावेळी सत्कारमूर्ती मोहम्मद सुलेमान यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देताना उपस्थितांनी त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यालयीन कार्यातील समर्पणाचा गौरव केला.याच कार्यक्रमात पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी बालासाहेब फड व सहाय्यक लेखा अधिकारी श्रीनिवास येण्णावर यांची इतरत्र बदली झाल्याने त्यांचाही सन्मानपूर्वक सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.समारंभात बालासाहेब फड, संदिपान घुंबरे तसेच कनिष्ठ सहाय्यक अनंत चाकोते यांनी मनोगत व्यक्त करत मोहम्मद सुलेमान यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनंत चाकोते यांनी केले. कार्यक्रमास पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच मोहम्मद सुलेमान यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दैनिक देशोन्नतीचे पत्रकार गजानन घुंबरे, दैनिक सकाळचे पत्रकार धनंजय देशपांडे तसेच पत्रकार के. डी. कदम यांची विशेष उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भुजबळ, नरलदकर, माऊली जाधव, पुरी व भदरगे यांनी विशेष परिश्रम घेतले.सेवानिवृत्ती हा केवळ सेवाकाळाचा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात असते. मोहम्मद सुलेमान यांच्या दीर्घ आणि निष्ठावान सेवेला उपस्थितांनी उभे राहून सलाम केला आणि त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close