आनंद निकेतन महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा-जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला दोखा निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
वाढत्या तापमानामुळे पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्षांच्या सोयीकरिता महाविद्यालयाच्या परिसरात जागोजागी पाणी भरलेली मातीची भांडे ठेवून चिमणी दिवस साजरा केला. विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद सवाने, प्रा. रामदास कामडी,प्रा .शौकत शहा , प्रा. संयोगिता वर्मा , प्रा. तिलक ढोबळे ,प्रा. हेमंत परचाके तसेच प्रयोगशाळा सहाय्यक भूषण सूर्यवंशी व अमलपुरीवर हे उपस्थित होते .