चंद्रपूरच्या जिल्हा परीषद मध्ये 26 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा थाटात सत्कार
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर जिल्हा परीषद येथील कार्यरत 26 कर्मचारी दि. 31 मार्च 2024 ला सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात थाटात पार पडला.
विशेष उल्लेखनीय बाब अशी चंद्रपूर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार केला जातो.
काल पार पडलेल्या सत्कार कार्यक्रमात त्यांना त्यांची सेवा निवृत्त वेतन प्रकरणे, शाल, श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरहु सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखा अधिकारी, दिपक जेऊरकर होते.
जेऊरकर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कार्याची प्रशंशा केली तसेच त्यांच्या प्रती गौरोवोद्गार काढुन पुढील आयुष्यासह त्यांना वाटचालीस शुभेच्छा व शुभकामना दिल्या.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अजय डोर्लीकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय टोगे, विश्वास बुरसे, मनीषा उपाध्ये, पूनम मुडेवार, विशाल घोडमारे यांनी अथक परीश्रम घेतले.