घटनापती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा तालुक्यातील पालांदूर चौ. आणि परिसरातील सर्व युवकांच्या सहकार्याने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालांदूर चौ. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळ्यासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा समोर मेणबत्ती प्रज्वलन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला लाभले वक्ते मा. जयेद्र देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनांच्या कार्यक्रम देवेश नवखरे,स्वप्निल खंडाईत,पंकज रामटेके,संतोष फरकुंडे ,पटेल सर, प्रकाश बांते,व्यंकटराव खंडाईत,राजेश वालदे, शालिकभाऊ बोरकर पाटील,रामदयाल कावळे, कैलास पोहनकर ,सतीश कांबळे
समस्त युवा सहकारी वर्ग यांच्या परिश्रमातून साकारण्यात आला.