नेरी शहर व्यापारी युनियन अध्यक्षपदी रवींद्र पंधरे तर सचिव अशोक तिडके

प्रतिनिधी:यशवंत कुंदोजवार
नेरी शहर व्यापारी युनियन ची आमसभा नुकतीच तीन डिसेंबर ला पार पडली या आमसभेत अध्यक्ष पदाच्या व कार्यकारिणी निवडीचा ठराव पारीत करण्यात येऊन निवडणूक घेण्यात आली यात रवींद्र पंधरे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून अशोक तिडके यांची निवड करण्यात आली अजिक्य रिसोर्ट सातारा येथे नेरी व्यापारी युनियन ची आमसभा आयोजित करण्यात आली होती अनेक विषयांवर चर्चा व तपशील सादर करण्यात आले तसेच मागील अध्यक्षांना निरोप देण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येऊन निवडणूक घेण्यात आली या चुरशीच्या निवडणुकीत तीन उमेदवार अध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने मतदान करण्यात आले यामध्ये रवींद्र पंधरे यांनी बाजी मारली आणि अध्यक्ष म्हणून निवडून आले यावेळी व्यापारी युनियन च्या सर्व सदस्यांनी पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.