नागपूरच्या नयना झाडेंना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर
अनेकांनी केले झाडे यांचे अभिनंदन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नुकताच नागपूर निवासी नयना संजय झाडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.दरम्यान त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, राजूराच्या जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे या शिवाय सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, रिना तेलंग, वैजयंती गहुकर, सरोज हिवरे, मंथना नन्नावरे, सोनाली इटनकर, कु.किरण साळवी, रजनी रणदिवे, कु.उज्वला निमगडे , चैताली आत्राम, रश्मी पचारे, प्रियंका गायकवाड, ज्योति इंगळे, ज्योति घाटे, आदिंनी नयना झाडे यांचे अभिनंदन केले आहे.विशेष उल्लेखनीय बाब अशी की झाडे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या गेल्या काही वर्षांपासून एक सदस्य असून सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोलाचे व भरीव योगदान राहिले आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते त्या मुंबईतील एका कार्यक्रमात आज हा पुरस्कार स्विकारीत आहे.